टोकियो | १८ सप्टेंबर २०२५
वर्ल्ड अॅथलेटिक्स चँपियनशिपमधील पुरुष भाला फेक स्पर्धेचा रोमांचक अंतिम सामना आज टोकियोत पार पडला. या स्पर्धेत त्रिनिदाद अँड टोबॅगोच्या केशॉर्न वॉलकॉटने ८८.१६ मीटर अंतर फेकून सुवर्णपदक पटकावत आपले वर्चस्व सिद्ध केले.
ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सने ८७.३८ मीटर अंतरासह रौप्य पदकाची कमाई केली, तर अमेरिकेच्या कर्टिस थॉम्पसनने ८६.६७ मीटर फेक करत कांस्यपदकावर नाव कोरले.
भारताच्या तरुण खेळाडू सचिन यादवने दमदार प्रदर्शन करत ८६.२७ मीटर अंतर फेकून चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. सुवर्णपदक विजेता होण्यासाठी काही सेंटीमीटरनी त्याची कामगिरी अपुरी ठरली. दरम्यान, टोकियोत भारतीय चाहत्यांच्या नजरा लागलेल्या नीरज चोप्राला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. त्याने ८४.०३ मीटर फेक करून आठवे स्थान मिळवले.
या निकालानंतर वॉलकॉटने जागतिक स्तरावर पुन्हा एकदा आपली भाला फेक कौशल्य सिद्ध केले, तर सचिन यादवच्या चौथ्या स्थानामुळे भारतीय अॅथलेटिक्सला आशेचा नवा किरण मिळाला आहे.
Very nice Sir