अहिल्यानगर महानगरपालिका: राष्ट्रवादी-भाजप युतीचा झंझावात

अहिल्यानगर | १६ जानेवारी २०२६

अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि भाजप युतीने स्पष्ट वर्चस्व मिळवले आहे. एकूण ६८ जागांपैकी युतीने तब्बल ५२ जागांवर विजय मिळवत सत्ता आपल्या बाजूने झुकवली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने २७ तर भाजपने २५ जागा जिंकल्या आहेत. युतीच्या या यशस्वी कामगिरीमुळे विरोधक पूर्णपणे बॅकफुटवर गेले आहेत.

या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) ला १० जागा मिळाल्या असून काँग्रेस आणि एमआयएमला प्रत्येकी २ जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर शिवसेना (ठाकरे गट) आणि बहुजन समाज पक्षाला प्रत्येकी १ जागा मिळाली आहे.

महानगरपालिकेतील निवडून आलेल्या नगरसेवकांची प्रभागनिहाय यादी पुढीलप्रमाणे आहे —

अहिल्यानगर महानगरपालिका – निवडून आलेले नगरसेवक

प्रभाग १

अ – सागर बोरूडे (राष्ट्रवादी)

ब – शारदा ढवन (भाजप)

क – दिपाली बारस्कर (राष्ट्रवादी)

ड – संपत बारस्कर (राष्ट्रवादी)

प्रभाग २

अ – रोशनी भोसले (भाजप)

ब – महेश तवले (राष्ट्रवादी)

क – संध्या पवार (राष्ट्रवादी)

ड – निखिल वारे (भाजप)

प्रभाग ३

अ – योगीराज गाडे (ठाकरे गट)

ब – ज्योती गाडे (राष्ट्रवादी)

क – गौरी बोरकर (राष्ट्रवादी)

ड – ऋग्वेद गंधे (भाजप)

प्रभाग ४

अ – शेख शहेनाज खालिद (एमआयएम)

ब – सय्यद शहाबाज अहमद (एमआयएम)

क – खान मिनाज जाफर (काँग्रेस)

ड – खान शम्स समीउल्ला (काँग्रेस)

प्रभाग ५

अ – काजल भोसले (राष्ट्रवादी)

ब – धनंजय कृष्णा जाधव (भाजप)

क – हरप्रीतकोर गंभीर (राष्ट्रवादी)

ड – मोहित पंजाबी (राष्ट्रवादी)

प्रभाग ६

अ – मनोज दुलम (भाजप)

ब – सोनाबाई तायगा शिंदे (भाजप)

क – सुनीता कुलकर्णी (भाजप)

ड – करण उदय कराळे (भाजप)

प्रभाग ७

अ – वर्षा सानप (भाजप)

ब – पुष्पा अनिल बोरूडे (भाजप)

क – वंदना विलास ताठे (भाजप)

ड – बाबासाहेब वाकळे (भाजप)

प्रभाग ८

अ – सुनीता भिंगारदिवे (राष्ट्रवादी)

ब – आशा कातोरे (भाजप)

क – नवनाथ कातोरे (शिवसेना – शिंदे गट)

ड – कुमार वाकळे (राष्ट्रवादी)

प्रभाग ९

अ – संजय शेंडगे (शिवसेना – शिंदे गट)

ब – रुपाली दातरंगे (शिवसेना – शिंदे गट)

क – वैशाली नळकांडे (शिवसेना – शिंदे गट)

ड – महेश लोंढे (भाजप)

प्रभाग १०

अ – श्रीपाद शंकर छिंदम (बसपा)

ब – शीतल अजय ढोणे (भाजप)

क – मयुरी सुशांत जाधव (भाजप)

ड – सागर राजू मुर्तडकर (भाजप)

प्रभाग ११

अ – उमेश खंडेराव कवडे (शिवसेना – शिंदे गट)

ब – सुनिता संतोष गणप्पा (शिवसेना – शिंदे गट)

क – आशा किशोर डागवले (राष्ट्रवादी)

ड – सुभाष सोपानराव लोंढे (भाजप)

प्रभाग १२

अ – मंगल सुनील लोखंडे (शिवसेना – शिंदे गट)

ब – सुरेखा संभाजी कदम (शिवसेना – शिंदे गट)

क – बाळासाहेब बोऱ्हाटे (शिवसेना – शिंदे गट)

ड – दत्तात्रय कावरे (शिवसेना – शिंदे गट)

प्रभाग १३

अ – सुरेश बनसोडे (राष्ट्रवादी)

ब – सुजाता महेंद्र पडोळे (राष्ट्रवादी)

क – अनिता विपुल शेटिया (राष्ट्रवादी)

ड – अविनाश हरिभाऊ घुले (राष्ट्रवादी)

प्रभाग १४

अ – प्रकाश भागनागरे (राष्ट्रवादी)

ब – सुनिता भगवान फुलसौंदर (राष्ट्रवादी)

क – मिना संजय चौपडा (राष्ट्रवादी)

ड – गणेश कुंडलिक भोसले (राष्ट्रवादी)

प्रभाग १५

अ – पौर्णिमा गव्हाळे (राष्ट्रवादी)

ब – दत्तात्रय गाडळकर (भाजप)

क – गीतांजली काळे (राष्ट्रवादी)

ड – सुजय मोहिते (भाजप)

प्रभाग १६

अ – सविता कांबळे (राष्ट्रवादी)

ब – वर्षा काकडे (राष्ट्रवादी)

क – विजय पठारे (भाजप)

ड – ज्ञानेश्वर येवले (भाजप)

प्रभाग १७

अ – मयूर बांगरे (राष्ट्रवादी)

ब – अश्विनी लोंढे (राष्ट्रवादी)

क – कमल कोतकर (भाजप)

ड – मनोज कोतकर (भाजप)

🔸 बिनविरोध निवडून आलेले नगरसेवक

कुमारसिंह वाकळे (राष्ट्रवादी)

प्रकाश भागनागरे (राष्ट्रवादी)

करण कराळे (भाजप)

सोनाबाई शिंदे (भाजप)

पुष्पा अनिल बोरूडे (भाजप)

या निकालामुळे अहिल्यानगर महानगरपालिकेतील सत्ताकारणाचा मार्ग जवळपास निश्चित झाला असून पुढील काळात महापौरपद आणि स्थायी समितीवर कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

नविन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!