विद्यार्थ्यांसाठी ‘स्वाधार’चा हातभार

मुंबई | ४ मार्च २०२६

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाकडून राबविण्यात येणारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सध्या विद्यार्थ्यांसाठी मोठा आधार ठरत आहे. शिक्षणासाठी वसतिगृहात प्रवेश घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य दिले जाते.

कोणाला मिळणार लाभ?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थी अनुसूचित जाती किंवा नवबौद्ध घटकातील असणे आवश्यक आहे. तसेच तो महाराष्ट्राचा रहिवासी असावा आणि शासकीय किंवा मान्यताप्राप्त वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असावा.

विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न ₹२.५ लाख किंवा त्यापेक्षा कमी असणे बंधनकारक आहे. तसेच विद्यार्थ्यांचे आधारकार्ड बँक खात्याशी संलग्न असणे आवश्यक आहे.

शैक्षणिक अटी काय?

🔹 ११ वीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना १० वीमध्ये किमान ५०% गुण आवश्यक.

🔹 १२ वी नंतर पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्यांना किमान ५०% गुण आवश्यक.

अर्ज कसा करावा?

विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शनासाठी संबंधित जिल्ह्याच्या सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Oplus_131072

 

अधिकृत संकेतस्थळ: https://sjsa.maharashtra.gov.in

शिक्षणासाठी आर्थिक अडचणींमुळे थांबलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही योजना संजीवनी ठरत असून, पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत अर्ज करून लाभ घ्यावा, असे आवाहन विभागाकडून करण्यात आले आहे.

 

 

नविन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!