मुंबई | 19 मार्च 2026
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 च्या नव्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वीच एक ऐतिहासिक योगायोग घडला आहे. यंदा पहिल्यांदाच सर्व १० संघांचे कर्णधार भारतीय खेळाडू असणार आहेत. सनरायजर्स हैदराबाद संघाने मोठा निर्णय घेत ईशान किशन याच्याकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे.
पॅट कमिन्स दुखापतीमुळे सुरुवातीच्या सामन्यांना मुकणार असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तो पूर्णपणे फिट होईपर्यंत ईशान किशन संघाचे नेतृत्व करणार असून अभिषेक शर्मा याला उपकर्णधार करण्यात आले आहे.
काय आहे विशेष?
IPL च्या इतिहासात हा केवळ दुसरा प्रसंग आहे जेव्हा सर्व संघांचे कर्णधार भारतीय आहेत. याआधी 2019 मध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे यंदाचा हंगाम भारतीय खेळाडूंच्या नेतृत्वासाठी खास ठरणार आहे.
ईशान किशनची कामगिरी
ईशान किशन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. T20 वर्ल्ड कपमध्ये त्याने भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती.
9 सामन्यांत 317 धावा
स्ट्राइक रेट: 199.37
त्यामुळे हैदराबादने त्याच्यावर विश्वास दाखवत तब्बल ₹11.25 कोटींना संघात घेतले आहे.
IPL 2026 – सर्व संघांचे कर्णधार
चेन्नई सुपर किंग्स – ऋतुराज गायकवाड
दिल्ली कॅपिटल्स – अक्षर पटेल
गुजरात टायटन्स – शुभमन गिल
कोलकाता नाईट रायडर्स – अजिंक्य रहाणे
मुंबई इंडियन्स – हार्दिक पंड्या
राजस्थान रॉयल्स – रियान पराग
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू – रजत पाटीदार
सनरायजर्स हैदराबाद – ईशान किशन
पंजाब किंग्स – श्रेयस अय्यर
लखनऊ सुपर जायंट्स – ऋषभ पंत
नविन बातम्यांसाठी 👉 http://ahilyanagar24live@.com