अहिल्यानगर |१६ एप्रिल
अहिल्यानगर जिल्ह्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज ‘शिक्षक सेना’ आक्रमक झाली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून थकीत असलेला पगार, महागाई भत्त्याची थकबाकी आणि सातव्या वेतन आयोगाचा हप्ता न मिळाल्याने संतप्त झालेल्या शेकडो शिक्षकांनी आज जिल्हा शिक्षण अधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. “आम्ही शाळांमध्ये ज्ञानदानाचे काम चोख बजावत आहोत, मात्र महिनाअखेर घरखर्च चालवण्यासाठी आम्हाला उसने पैसे घ्यावे लागत आहेत,” अशी अत्यंत कडाक्याची भावना आंदोलक शिक्षकांनी व्यक्त केली आहे.
शिक्षकांचा आरोप आहे की, शिक्षण विभागाच्या तांत्रिक त्रुटींमुळे आणि प्रशासकीय दिरंगाईमुळे वेळेवर वेतन मिळत नाही. सातव्या वेतन आयोगाचा हप्ता आणि महागाई भत्त्याचा फरक गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित आहे, ज्यामुळे शिक्षकांवर मोठी आर्थिक कुऱ्हाड ओढवली आहे. याविरोधात आज काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये ‘शिक्षक सेना’ आणि इतर शिक्षक संघटनांनी प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारला आहे.
यावेळी शिक्षक सेना जिल्हा सचिव उद्धवराव सोनवणे, कार्याध्यक्ष रावसाहेब मस्के, उपाध्यक्ष महेश कुलकर्णी.विठ्ठलराव उरमूडे, अविनाश साठे, शेख सर, प्रसाद शिंदे, बापू दुधाटे.सोमनाथ नजन, दिगंबर हरवा, मंगेश पालवे, कोतकर सर, शिंदे सर, संकेत मस्के, रामलाल कर्डिले, विनायक आहेर, अजिंक्य गायकवाड यांसह बहुसंख्य शिक्षक बांधव उपस्थित होते.
