अहिल्यानगर | 18 फेब्रुवारी 2026
बोल्हेगाव येथील सनराईज इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये आज शिवजयंतीनिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत परिसरात शिवमय वातावरण निर्माण केले.
मिरवणुकीदरम्यान ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी, जय शिवाजी’ या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला. घोड्यावर स्वार प्रतिकात्मक छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारणाऱ्या विद्यार्थ्याने नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. तसेच काही विद्यार्थ्यांनी मावळ्यांची वेशभूषा परिधान केली होती, हे मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले.

या प्रसंगी शाळेचे ट्रस्टी सुहासकुमार देठे, आकाश देठे, ट्विंकल गुप्ता, संचालिका अनिता सुहासकुमार देठे व विनया देठे प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक सुशांत सामलेटी, पर्यवेक्षिका पायल मुथा तसेच शिक्षक रेखा बोचरे, मीनाक्षी हिरभगत, रोहिणी भालेराव, यशोदा नाणेकर, रसफराज सय्यद, समृद्धी जाधव, शिल्पा पवार, कविता गायकवाड, गीता सोनवणे, सुनीता नागर, प्रेमलता अल्हाट, अर्चना पवार, कल्पना वीर, अंजली माने, ऐश्वर्या सोलंके, योगिता शिंदे आणि सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
शोभायात्रेमुळे बोल्हेगाव परिसरात शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळाला.
नविन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live.com फॉलो करा