जयंती निमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून बालघर प्रकल्पाला भेट

अहिल्यानगर |  २५ मार्च

माजी आमदार स्व. अरुण जगताप यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांनी बालघर प्रकल्पाला भेट देत सामाजिक बांधिलकी जपण्याचा उपक्रम राबवला. यावेळी महापौर ज्योती गाडे उपस्थित होत्या.

महिला शहर जिल्हाध्यक्ष रेश्मा आठरे यांनी स्व. जगताप यांच्या कार्याच्या आठवणी सांगत त्यांच्या समाजाभिमुख भूमिकेचा उल्लेख केला. तसेच बालघर प्रकल्पाला भेट देण्यामागील उद्देश स्पष्ट करत प्रकल्पाचे युवराज गुंड यांचे आभार मानले.

प्रदेश सचिव लतिका पवार यांनी स्व. अरुण जगताप, अजित पवार आणि शिवाजीराव कर्डीले यांच्या निधनामुळे समाज व राजकीय क्षेत्राचे मोठे नुकसान झाल्याचे नमूद केले.

महापौर ज्योती गाडे यांनी स्व. जगताप यांना आदरांजली अर्पण करत बालघर प्रकल्पाच्या कार्याचे कौतुक केले. या भेटीदरम्यान महिला पदाधिकाऱ्यांनी बालकांशी संवाद साधत त्यांच्या गरजांची माहिती घेतली.

या उपक्रमातून सामाजिक जाणीव आणि सेवाभाव वाढवण्याचा संदेश देण्यात आला.

 

नविन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!