अहिल्यानगर | २२ मार्च २०२६
अहिल्यानगर शहरातील बोल्हेगाव उपनगरातील गांधीनगर येथील मदिना मस्जिदमध्ये रमजान ईदनिमित्त विशेष नमाज अदा करण्यात आली. या प्रसंगी देशाच्या प्रगतीसाठी तसेच अमन, शांतता आणि एकात्मता नांदावी यासाठी अल्लाहकडे प्रार्थना करण्यात आली.
रमजान महिना हा प्रेम, बंधुभाव आणि एकतेचा संदेश देणारा पवित्र काळ मानला जातो. महिनाभर रोजे ठेवून मुस्लिम समाज ईद-उल-फित्र हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो. यंदाही गांधीनगर येथील मस्जिदमध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधवांनी नमाज अदा करून देशात शांतता आणि सौहार्द टिकून राहावे, अशी दुआ केली.

या वेळी नगर जिल्ह्यात सर्व समाजाने जातीभेद विसरून एकोप्याने राहावे, असा संदेश देण्यात आला. नमाजनंतर उपस्थितांनी एकमेकांना “ईद मुबारक”च्या शुभेच्छा देत बंधुभावाचा संदेश दिला. तसेच गरीब व गरजू नागरिकांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. ईदच्या निमित्ताने घरोघरी पारंपरिक शीरखुरमा व विविध खाद्यपदार्थ तयार करून आनंद साजरा करण्यात आला.
या प्रसंगी मौलाना इर्शाद रझवी आलम यांनी सामुदायिक नमाज पठण करत एकात्मतेचा संदेश दिला.
कार्यक्रमाला मदिना मस्जिदचे अध्यक्ष नुरमहंमद शेख, चांद शेख, रज्जाक शेख, महेबूब शेख, लतीफ बेग, अजीजखा पठाण, जब्बार शेख, युनुस बेग, दिलावर शेख, आयुब शेख, राजू शेख, मुख्तार शेख, इस्राईल पठाण, फारुख पठाण, फिरोज शेख, रिजवान शेख तसेच परिसरातील हजारो मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
नविन बातम्यांसाठी 👉 http://Ahilyanagar24live.com